राज्याच्या हवामानात पुन्हा बदल पाहायला मिळतोय. उत्तर भारतामध्ये तापमानाचा पारा वर चढत आहे. तर, महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पुढील २४ देशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. राज्यात सध्या उन पावसाचा खेळ सुरू असल्याचं दिसत आहे. एकिकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे, तर दुसरीकडे विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान खात्याने पुढील २४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमानाने ४० अंशांचा पारा ओलांडला आहे. आज सध्या राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. आज अकोला येथे देशातील उच्चांकी म्हणजेच ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.