Friday, December 1, 2023

Weather Alert: अहमदनगर सह राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहेत. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे दरम्यान, येत्या ३-४ तासांत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना ढगांच्या गडगडाचा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर , जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या ३ ते ४ तासांत जळगाव, रायगड, रत्नागिरी, बीड तसेच धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे.

आज हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच शुक्रवारी विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळेल. यापार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: