Thursday, July 25, 2024

अहमदनगर मध्ये जोरदार पाऊस, नगर तालुक्यात ढगफुटी.. व्हिडिओ

अहमदनगरयंदा वरूण राजाने कृपा दाखवल्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामाचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. 14 जूनअखेर जिल्ह्यातील उत्तर भागातील तालुके वगळता दक्षिण जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि राहुरी तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. तर उत्तरेतील राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, अकोले येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. दरम्यान, बुधवारी नगर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यावर पावसाने कृपा दाखवत मुसळधार हजेरी लावली. अनेक ठिकाणी बंधारे, ओढे, नाले 15 जूनच्या आत तुडूंब झाले आहेत.

नगर तालुक्यात अनेक ठिकाणी धुव्वाँधार पाऊस झाला असून यामुळे ओढे, नाले तुंडूब भरलेले आहेत. या पावसामुळे खरीप हंगामासाठी पेरणी लायक पाऊस झाला असून येत्या काही दिवसात जिल्ह्यात पेरण्यांना सुरूवात होणार आहे. बुधवारी झालेला पाऊस नालेगाव 36, कोपूरवाडी 35, भिंगार 25, नागापूर 42, वाळकी 45.5., रुईछत्रपती 46.5, सुपा 39, टाकळी 29, श्रीगोंदा 34, काष्टी 46, मांडवगण 26, बेलवंडी 32, पेडगाव 46, चिंभळा 33, कोळगाव 30, राशिन 58, भांबोरा 28, नेवासा 21, सलाबतपूर 20.8, टाकळीमियॉ 21.3, पिंपरने 55.5, श्रीरामपूर 21, बेलापूर 36 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles