अहमदनगर – नगर दौंड महामार्गावर हिवरे झरे परिसरात सोमवारी दुपारी झालेल्या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली अपघातात अक्षय ढोमसे वय 30,आयुष पवार वय 18 यांचा मृत्यू,डॉक्टर संजय काळे गंभीर झाले आहेत .
नगर दौंड महामार्गावर दुपारी 1 च्या सुमारास आय 20 आणि कंटेनर ची समोरासमोर धडक झाली अपघातात आय 20 चा चक्काचूर झाला. डॉ.काळे हे दोन नातेवाईकासोबत नगरच्या दिशेने येत होते तर कंटेनर नगर होऊन श्रीगोंदाच्या दिशेने जात होता
अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांसह वाटसरोंनी अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयास देण्यास मदत केली मयत हे डॉ. डॉक्टर काळे यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे जखमींवर नगर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातातील सर्वजण श्रीगोंदा तालुक्यातील आहेत