अहिल्यानगर : प्रतिनिधी अहिल्यानगर महानगर पालिकेमधील सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्त्या देण्यासंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र पाठवून सर्वेाच्च न्यायालयाचा निर्णय तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासननिर्णयाकडे लक्ष वेधून सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्याची मागणी केली आहे. दरम्यान अहिल्यानगर महापालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती मिळवून देवू अशी ग्वाही खासदार नीलेश लंके यांनी दिली आहे.
खा. लंके यांनी पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे की, सफाई कामगारांच्या प्रश्नावर दि.२९ जानेवारी २०२५ रोजी अहिल्यानगर महापालिकेमध्ये झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेने या प्रश्नासंदर्भात नगरविकास विभागाकडे मार्गदर्शक प्रस्ताव पाठविला असून त्याअनुषंगाने नगर विकास विभागाकडून आलेल्या पत्रांसंदर्भात वेळोवेळी खुलासाही सादर करण्यात आलेला असल्याचे खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या १३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ” उ ” मधील तरतुदीनुसार त्वरीत कार्यावाही करण्याबाबात सुचित करण्यात आले आहे. महानगरपालिकेमध्ये या प्रश्नावर झालेल्या बैठकीदरम्यान ही बाब आपण नगर विकास विभाग- २५ चे प्रधान सचिव यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा करताना निदर्शनास आणून दिलेली आहे. या चर्चेदरम्यान प्रधान सचिवांकडून या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे खा. लंके यांनी या पत्राच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले आहे.
संबंधित ३०५ व ५०६ कोर्ट केसेसमध्ये सफाई कर्मचारी आयोग येऊन ३९५०/२३ नुसार पिटीशन दाखल आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रातील सफाई कामगारांचा विषय असून ३०५ व ५११ कर्मचाऱ्यांच्या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये सन १९९९ मध्ये नियुक्या कायम करण्यात आल्या. शासनाने विशेष बाब म्हणून नियुक्या दिल्या, त्यांना लाड-पागे समितीच्या शिफारसी लागू होणार नाहीत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ती पदे व्यपगत होती असा शासन निर्णय पारित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर दि.२४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुकंपा तत्वावरील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नेमणूका देण्यासंदर्भात निर्णय देण्यात आला असल्याचेही खास. नीलेश लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे.
मालेगांव महानगरपालिकेमध्ये या नियुक्त्यांसंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना नेमणुका देण्यासही सुरूवात केली असल्याची माहीती असल्याचे खा. लंके यांनी या पत्रात म्हटले आहे. दरम्यान याच प्रश्नावर मा. नगरसेवक दिप चव्हाण, अभिषेक कळमकर, योगीराज गाडे यांनीही या प्रश्नावर बैठकीत सविस्तर माहीती देऊन नियुक्ती देण्याची मागणी केली आहे.
मा. नगरसेवक दिप चव्हाण, अभिषेक कळमकर, योगीराज गाडे यांनी देखील बैठकीमध्ये सविस्तर माहिती देऊन नियुक्त्या देण्याबाबत मागणी केली.
अहिल्यानगर महानगर पालिकेमधील सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती मिळवून देणार
- Advertisement -