पुण्याच्या बावधान मध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातामध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सजवळ असलेल्या हेलिपॅडपासून १.५ किमी अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वी मुळशीमध्ये देखील अशीच घटना घडली होती. सुदैवाने त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन मध्ये पावणे सातच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. धुकं असल्याने बराच वेळ हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घेत होत. अखेर ते क्रॅश झालं आणि जमिनीवर कोळलं. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस पोहचले आहेत. याआधी देखील मुळशी मध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळलं होतं सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती. परंतु, त्या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडलेली आहे.