Tuesday, September 17, 2024

खा.निलेश लंके यांना समन्स पाठविण्याचा हायकोर्टाचा आदेश, आता ‘या’ तारखेला पुढील सुनावणी

अहमदनगर : खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सोमवारी (दि.५) प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी खा.लंके यांना समन्स पाठविण्याचा आदेश खंडपीठाने दिला असून पुढील सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे. न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

नगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

डॉ. विखे यांनी ॲड. आश्विन होन यांच्यामार्फत १८ जुलै रोजी दाखल केलेल्या याचिकेतून काही मतदान केंद्रांवरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. संबंधित ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही. त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रितसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केलेली आहे. याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत.

तसेच निलेश लंकेंनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्षातील खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही. परिणामी लंकेंनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातल्या मर्यादेचे उल्लंघन झालेले, आदी मुद्यांवर सुजय विखे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.

या सर्व बाबींमुळे निलेश लंके यांना निवडून आल्याचा जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. खंडपीठाने याचिका दाखल करून घेतलेली आहे. त्यावर प्राथमिक सुनावणी सोमवारी (दि.५) खा.लंके यांना समन्स पाठविण्याचा आदेश न्यायमूर्ती किशोर संत यांनी दिले आहेत. आता पुढील सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles