हिमाचल प्रदेशातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर विधानसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधात जाऊन राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 6 आमदारांना अध्यक्षांनी अपात्र घोषित केलं आहे. व्हिपचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली. हिमाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतपाल पठानिया
पक्षांतर बंदी कायद्यानुसार 6 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष सतपाल पठानिया यांनी सांगितलं. सतपाल पठानिया म्हणाले, 6 आमदारांविरुद्ध तक्रार मंत्री हर्ष वर्धन यांनी केली होती. त्यानंतर दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ही कारवाई केली. या आमदारांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढली होती, मात्र त्यांनी पक्षाचा व्हिप पाळला नाही. त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं. दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून मी ही कारवाई केली, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.
व्हिप डावलून मतदान करणाऱ्या आमदारांना काँग्रेसचा धक्का, 6 आमदार अपात्र!
- Advertisement -