Wednesday, January 22, 2025

HMPV विषाणूची लागण झालेल्या भारतातील रुग्णांबाबत केंद्राची महत्त्वाची माहिती, जारी केलं निवेदन

चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नेटवर्क लॅबोरेटरीजच्या नियमीत तपासणीदरम्यान किमान दोन एचएमपीव्हीचे रूग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान या संसर्गासंबंधी केंद्र सरकारने काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

भारतातील या व्हायरससंबंधी परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये एचएमपीव्ही भारतासह जागतिक स्तरावर आधीपासूनच प्रसारित झाला आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. या संक्रमणावर लक्ष ठेवले जात असताना भारतातही याची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. या दोनही रुग्णांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमणांचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.

भारतात एचएमव्हीपी संसर्ग हा बॅप्टिस्ट हॉस्पिटल-बेंगळुरूमधील एका तीन महिन्याच्या मुलीला आणि आठ महिन्याच्या मुलाला झाल्याचे आढळून आले आहे. दोन्ही मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली होती, त्यानंतर सध्या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला असून मुलावर उपचार केले जात आहेत आणि तो बरा होत आहे.

इतकी काळजी का घेतली जातेय?
आरोग्य मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त मॉनिटरिंग ग्रुप तयार केला होता. हा गट जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी चिनमधील परिस्थितीबद्दल माहिती घेत आहे. हिवाळ्याच्या दिवसात जगभरातील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या श्वसनासंबंधीत संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या घटना समोर येतात. असे असले तरी चीनच्या आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान संयुक्त मॉनिटरिंग गट चीनमध्ये पसरत असलेल्या या आजारासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेकडून सातत्याने अपडेट मागवत आहे.

आपल्याला एचएमपीव्ही बद्दल काय माहिती आहे?
कोविड-१९ साथीच्या आजारासाठी कारणीभूत व्हायरस हा आपल्यासाठी अज्ञात होता. पण एचएमपीव्ही हा आपल्याला माहिती असलेला विषाणू संसर्ग आहे. या विषाणूमुळेच अंदाजे १२ टक्के संक्रमणे होतात. हा विषाणू रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस (RSV) सारखाच आहे, जे की साधारणपणे आढळून येणारे श्वसनासंबंधी व्हायरल संक्रमण आहे. २००१ मध्ये नेदरलँड्समधील २८ मुलांमध्ये एचएमपीव्ही पहिल्यांदा आढळून आला होता. हे एव्हीयन मेटाप्युमोव्हायरसचा पुढील प्रकार असून यामुळे विविध पक्ष्यांमध्ये विविध लक्षणे दिसून येतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles