Saturday, January 25, 2025

कोरोनाच्या ५ वर्षांनंतर पुन्हा पसरतोय व्हायरस ,जगात पुन्हा लागणार लॉकडाऊन?

तब्बल 5 वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसने सर्व जगात थैमान घातलं होतं. तर आता पुन्हा एकदा चीनमध्ये एक रहस्यमयी व्हायरस पसरल्याची माहिती आहे. नुकतंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या या व्हायरसच्या बातम्यांमध्ये वाढ होताना दिसतेय. काही लोक याला नव्या महामारीचे संकेत असल्याचं म्हणतात.

सध्या चीनमध्ये लहान मुले आणि वृद्धांमध्ये श्वसनाच्या आजारांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. लहान मुलं आणि वृद्ध या आजारासाठी अधिक संवेदनशील असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.या व्हायरसची लक्षणं सर्दी आणि फ्लू सारखीच असतात. यामध्ये ताप, खोकला, नाक वाहणं, कधीकधी श्वास घेण्यात अडचण येणं अशी आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये ते न्यूमोनियासारख्या गंभीर समस्याचं रूप घेऊ शकते. चीन सरकार किंवा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबत कोणताही औपचारिक इशारा जारी केलेला नाही. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हा व्हायरस हंगामी लाट असून नवीन साथीचा रोग नाहीये.

याच दरम्यान सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतायत. ज्यामध्ये रुग्णालय रुग्णांनी भरलेली आहेत आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याच दिसून येतंय. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोविड लॉकडाऊन दरम्यान लोकांचा इतर सामान्य व्हायरसची संपर्क कमी झाला, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली.तज्ञांच्या मते, सध्या इन्फ्लूएंझा ए हा मुख्य रोग आहे आणि hMPV ची काही प्रकरणं नोंदवली गेली आहेत. पण hMPV हा नवीन आजार नाही.

हा आजार टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला आणि आजारी असाल तर घरीच रहा. लहान मुले आणि वृद्ध यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. यासंदर्भात कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. चीनमध्ये या आजाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे, लॉकडाउनच्या अफवा पुन्हा एकदा जगभरात वाढतायत. परंतु तज्ञ म्हणतात की, हा एक सामान्य हंगामी आजार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles