कोथरुडमधील गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही, तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही.” पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले.