सोशल मीडियावर जगभरातील अनेक भागातील घटना क्षणाधार्त व्हायरल होत असतात. सोशल मीडिया एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे काही वेळात अनेक व्यक्ती प्रसिद्द होतात तर काहींची प्रसिद्धी क्षणार्धात ढासळते. सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा प्रामाणिकपणा दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो व्हिडिओ सध्या सर्वत्र तूफान व्हायरल होत आहे आणि त्या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नक्की काय झाले आहे ते तुम्ही खाली व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहा.
व्हायरल होत असलेला व्हायरल व्हिडिओ अहमदनगरच्या शेवगाव येथील आहे. जिथे शेवगावच्या कृषिउत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यानं विकलेल्या धान्याच्या पोत्यात हमालाला अडीच लाखाचे सोन(Gold) सापडलं आहे. मात्र तब्बल अडीच लाखाचे सोन सापडलं असतानाही या हमालाने प्रामाणिकपणा दाखपत ते सोन परत दिलेले आहे. सध्या या हमालाचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे शिवाय या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु आहे.
शेवगाव तालुक्यातील हसनापूर गावचे शेतकरी गोरक्ष ढाकणे यांनी व्यापारी राम सारडा यांना धान्य विकले. यानंतर हमाल जालिंदर रेवडकर यांना धान्य पोत्यात भरत असतांना सोन्याच्या डब्या सापडला.मात्र त्यांनी त्या व्यापाऱ्याला दिला. त्यानंतर त्या व्यापाऱ्याने शेतकरी ढाकणे यांना संपर्क करून ते अडीच लाखाचे दागिने परत केले. यावेळी हमालाचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागात दागिने चोरी जाऊ नये यासाठी धान्याच्या पोत्यात सोने ठेवले जाते.मात्र लक्षात न आल्याने शेतकऱ्यांने धान्याची पोती व्यापाऱ्याला विकून टाकले तर व्यापारी आणि हमालाच्या इमानदारीमुळे शेतकऱ्याला आपले दागिने परत मिळाले.
https://x.com/TanviPol116027/status/1838778498598465637?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1838778498598465637%7Ctwgr%5E81c48759cc8aed9f997183745e4867cc19a770e0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fviral-videos%2Fahmednagars-shevgaon-a-hamala-found-gold-worth-two-and-a-half-lakhs-in-a-sack-of-grain-which-he-returned-in-a-show-of-honesty-watch-viral-video-tsp2000
सध्या संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवरील ”@TanviPol116027” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओतील व्यक्तीचे कौतुक मोठ्या प्रमाणात केले जात आहे.