औद्योगिक, कृषी प्रक्रिया व सामाजिक सेवेत योगदान देणाऱ्यांचा गौरव
आमी व स्नेहालयाने केले डॉ. चौधरी, सौ. चौधरी, पद्मश्री पवार व पारगावकर यांना सन्मानित
देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक आणि शिक्षण संस्थांना पुढे घेऊन जावे लागणार -डॉ. प्रमोद चौधरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील आमी संघटना व स्नेहालय संस्थेच्या वतीने भारताच्या औद्योगिक, कृषी प्रक्रिया व सामाजिक सेवेत योगदान देणारे डॉ. प्रमोद चौधरी, सौ. परिमल चौधरी, पुणे येथील सहायक समिती अध्यक्ष तथा उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार, एल ॲण्ड टी चे अरविंद पारगावकर यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन्मान कर्तृत्वाचा, कृतज्ञता योगदानाची या कार्यक्रमातंर्गत पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री प्रतापराव पवार होते. आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी पाहुण्याचे स्वागत करुन स्नेहालय व आमी संघटना एमआयडीसी मधील कामगार वर्ग व मालक यांच्या मदतीसाठी कायम उभी असते. एकमेकांना सहकार्य करुन प्रगतीकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. स्नेहालयाचे संचालक गिरीश कुलकर्णी यांनी आमी व स्नेहालय हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले.
डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले की, भारताच्या औद्योगिक कृषी प्रक्रिया आणि सामाजिक सेवेत मी योगदान दिले आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित ही करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील भूमिपुत्र असल्याचा अभिमान आहे. देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक आणि शिक्षण संस्थांना पुढे घेऊन जावे लागणार आहे. स्नेहालय व माझे खुप जुने नाते असून, अमीची नाळ एकच आहे. माझी आजी रुक्मिणीबाई चौधरी यांची प्रेरणा आम्हाला मिळत असल्याचे स्पष्ट करुन स्नेहालयाच्या सामाजिक कामांना नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार म्हणाले की, सामाजिक जीवनात काम करताना विकास पत्रकारीतेचा पाया रचला. बालग्राम नावाच्या संस्थेच्या माध्यमातून एड्स बाधित महिला व अनाथ मुलांना एकत्र आणून त्यांना शिक्षण देऊन प्रशिक्षित करण्याचे काम केले. त्यांना राहण्यासाठी निवारा दिला, त्यामुळे अनाथ मुलांना आईचे प्रेम भेटले. डिजीटल युगात माणसाला आयुष्यात नेहमी बदल हवे असतात. आज काल मोबाईलमुळे लोक मानसिकरुग्ण होत चालले आहेत. मोबाईलमुळे लोकांचा स्वभाव हा तापट होत असून, गुन्हेगारीतही वाढ झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जयद्रथ खाकाळ यांनी एमआयडीसीचा विकास साधण्यासाठी आमी संघटना विविध मोठ्या कंपन्या नगरमध्ये आणण्याचे प्रयत्न करत आहे. यासाठी संघटनेला मोठी मदतीची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात जर्मन,ऑस्ट्रेलियन कंपन्या गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. नगरमधील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संजय बंदिष्टी ह्यांनी कार्यक्रम घडवून आणण्यात साठी महत्त्वाचे सहकार्य केले.
कार्यमाचे संचालन स्नेहालयच्या सेक्रेटरी प्रीती भोम्बे ह्यांनी सूत्र केलें तर राजीव गुजर ह्यांनी प्रास्ताविक केले
यावेळी आमीचे मिलिंद कुलकर्णी, सतीश गवळी, सागर निंबाळकर, सचिन काकड, कल्पेश इंदानी, सुनील कानवडे, रोहन गांधी, प्रफुल्ल पारक, राजीव गुजर, स्नेहालयाचे संचालक गिरीश कुलकर्णी, भूषण देशमुख आमीचे व स्नेहालयाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औद्योगिक, कृषी प्रक्रिया व सामाजिक सेवेत योगदान देणाऱ्यांचा गौरव
- Advertisement -