नगर दौंड रोडवर काळे वाडी येथे अपघात एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी
अहमदनगर -नगर-दौंड महामार्गावर झालेल्या नुकत्याच एका अपघातात दोन जण जागीच ठार झाले होते. त्यापाठोपाठ आता पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून चार जण जखमी आहे.
नगर-दौंड महामार्गावरील हिवरेझरे परिसरात ०४ सप्टेंबर रोजी सकाळी भरधाव कंटेनर आणि चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारचा चक्काचुर झाला. अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात कार मधील जखमी अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच संदेश कार्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.