Tuesday, April 23, 2024

अहमदनगर पुणे महामार्गावर लक्झरी बस आणि मालट्रकचा भीषण अपघात

नगर पुणे महामार्गावर भरधाव वेगातील लक्झरी बस रस्ता ओलांडणाऱ्या मालट्रकवर जावून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात बस मधील १५ ते १६ प्रवासी जखमी झाले आहेत. गुरुवारी (दि.२९) रात्री ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान म्हसणेफाटा (ता.पारनेर) परिसरात हा अपघात झाला आहे.

गुरुवारी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान अहमदनगर पुणे महामार्गावर म्हसणेफाटा येथील कैलास गाडीलकर यांच्या पेट्रोल पंपा समोर एक ट्रक (क्र. एम.एच. १६ सीडी ९५५०) हा पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना त्याच वेळी पुण्याच्याकडून अहमदनगरच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेली चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस (क्र.एम एच २९ बी ई ००९९) ही त्या वळण घेत असलेल्या ट्रकवर जोरात आदळली. या भिषण अपघातात बस चालकासह बस मधील १५ प्रवासी जखमी झाले. यात बस चालक गंभीर जखमी असुन त्यास अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर जखमीना सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरुण आव्हाड फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघात ग्रस्त वाहने बाजुला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. सर्व जखमीना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles