Monday, March 4, 2024

अहमदनगर पुणे महामार्गावर खाजगी आराम बसला भीषण अपघात…३३ प्रवासी बसचा क्लीनर

नगर पुणे महामार्गावर चास (ता.नगर) गावाच्या पुढील बाजूस असलेल्या वळणावर खाजगी आराम बसला मंगळवारी (दि.३०) सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असल्याने वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस रस्त्यावरच उलटली. या बस मध्ये सुमारे ३३ प्रवासी होते. ते सुदैवाने या अपघातातून बालंबाल बचावले असून बसचा क्लीनर गंभीर रित्या जखमी झाला आहे.

छत्रपती संभाजी नगर कडून अहमदनगर मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या बिंदुसरा एक्सप्रेस नावाच्या (क्र.एम.एच.२०,डी.डी.०२२३) या बसला हा अपघात झाला आहे. बस रस्त्यावर उलटल्या नंतर प्रवाशांनी मोठा आरडाओरडा केला. अनेक प्रवासी डोक्याला, हाताला मार लागून किरकोळ जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच कामरगाव येथील मृत्युंजय दूत सिद्धांत आंधळे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्यांनी तात्काळ बाहेर काढत किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना चास येथील रुग्णालयात हलविले तर गंभीर जखमी झालेल्या क्लीनरला उपचारासाठी नगरला हलविण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles