Friday, February 23, 2024

हॉस्टेलमधील तरुणींनी जुगाड करून बनवलेल्या रस्स्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या हॉस्टेलमध्ये घालवलेले दिवस नक्की आठवतील. या व्हिडीओमध्ये काही तरुणींनी हॉस्टेलच्या खोलीत गुपचूप चिकनचा रस्सा बनवण्याचा जुगाड केलेला आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये अन्नपदार्थ बनवण्याची परवानगी नसते. मात्र रात्री-अपरात्री भूक लागल्यानंतर अनेक विद्यार्थी अशा भन्नाट युक्त्या वापरुन आपल्या जेवणाची सोय करतात. सुरवातीला एका ताटलीमध्ये कांदा, बटाटा, सिमला मिरची अशा भाज्या मुलींनी चिरून ठेवल्या आहेत. आता चिकनचा रस्सा बनवण्यासाठी त्यांनी, पाणी तापवणारी इलेक्ट्रिक किटली घेतली आहे. या लहानश्या किटलीमध्ये सर्वप्रथम त्यांनी कच्च्या चिकनचे तुकडे टाकले आहेत. नंतर त्यामध्ये पाणी घालून चिरलेल्या सगळ्या भाज्या, तिखट, हळद, मीठ असे सर्व जिन्नस घालून लहानश्या चमच्याने तो रस्सा ढवळत आहेत.

किटलीमधील पाणी उकाळ्यानंतर शेवटी त्यात कोथिंबीरदेखील घातली आहे. असा सर्व खटाटोप केल्यानंतर सर्व मुलींनी एकत्र बसून हा जुगाड वापरून तयार केलेला चिकनचा रस्सा अगदी मजेने खाल्ला आहे. असे आपण शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @tanushree_khwrkpm नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles