पाचेगाव : बेलपिंपळगाव (ता. नेवासा)हद्दीतील एका हॉटेल चालकाच्या डोक्यावर टणक हत्याराने वार करत खून केल्याची घटना बुधवारी
(दि. १३) पहाटेच्या सुमारास घडली.बाळासाहेब सखाहरी तुवर (वय ६०,रा. कारवाडी, पाचेगाव, ता. नेवासा)असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. श्रीरामपूर- नेवासा मार्गावरील लोखंडी फॉल नजीक ओम साई नावाने ते हॉटेल चालवीत होते. मंगळवारी (दि. १२) रात्री ते हॉटेलमध्येच झोपले
होते.
बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या डोक्यावर अज्ञात व्यक्तीने टणक हत्याराने वार करत खून केला. घटनेची माहिती समजताच नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी मृताचे पुतणे विष्णू गंगाधर तुवर (रा. पाचेगाव, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली. अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.