पुणे जिल्ह्यातील बारामती येथील हॉटेल राजवाडा पार्क येथे हे ‘लाडकी सुनबाई योजना’ राबवली जात आहे. या हॉटेलने याचे बॅनर सुद्धा छापले आहे. सध्या या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सासुबाईच्या जेवणावर सुनबाईचे जेवण फ्री, लाडकी सुनबाई योजना!
या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की एका ऑटो रिक्षाच्या मागच्या बाजूला हे बॅनर बांधले आहे. आणि या बॅनर वर लिहिलेय, “हॉटेल राजवाडा पार्क, ‘लाडकी सुनबाई योजना’ सासुबाई च्या जेवणावर सुनबाई चे जेवण फ्री.
आवश्यक गोष्टी
१. सासूबाईला जेवायला घेऊन येणे आवश्यक आहे
२. सासुबाईंना जी थाळी देणार तीच थाळी सुनबाईंना फ्री मिळणार
३. कमीत कमी घरामधील पाच लोकांना जेवायला आणणे.