उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी डोंगर कड्यावर बांधलेल्या एका हॉटेल रुमचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. दरीजवळ बांधण्यात आलेल्या या रुमचं डिजाईनचं सौंदर्य त्यांना आवडलं आहे. परंतु, जगभरात मुसळधार पावसामुळे घडणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनांचा विचार केला तर, हे खूप भीतीदायक आहे. पावसामुळे जर दु्र्दैवाने या ठिकाणी घातपात झाला, तर जीव गमवावा लागू शकतो, असं महिंद्रा यांना वाटतंय.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “या सुंदर डिजाईनला पाहून मी आश्चर्यचकीत झालो असतो. पण जगभरात मुसळधार पावसामुळे निसर्ग संकट ओढावतं. मी या ठिकाणी एका रात्रीसाठी जाईल, असं मला वाटत नाही.” व्हिडीओत काच आणि लाकडाने बनवलेला एक बेडरुम दिसत आहे. हा बेडरुम एका दरीजवळ लटकताना दिसत आहे.
Ordinarily, I would have marveled at this beautiful design but with the unpredictable fury & impact of the rains now being evident around the world, I’m not sure I’d sign up for a night in this space! pic.twitter.com/ao9XC6EHxF
— anand mahindra (@anandmahindra) July 12, 2023