Wednesday, February 28, 2024

बिगर चावीचं कुलुप 10 सेकंदात कसं तोडायचं?..चोरानं पोलिसांनाच दाखवली ट्रिक

केवळ १० सेकंदात तो कसा आपल्या बेल्टच्या मदतीनं जेलचं टाळं तोडून दाखवतो. हा प्रकार पाहून खुद्द पोलीस देखील शॉक झाले आहेत. कारण हा चोर जणू पोलिसांपेक्षाही हुशार निघाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुरुंगाचं टाळं तोडण्यापूर्वी चोरानं आधी नीट निरिक्षण केलं. मग थोडा विचार करून त्यानं एक बेल्ट काढला आणि तो टाळ्यामध्ये अडकवला. मग या बोल्टची दुसरी बाजू त्यानं तुरुगाच्या गजांवर अडकवली अन् मग या बेल्टवर तो उभा राहिला. आणि बस थोड्याच वेळात ते टाळं आपोआप उघडून खाली पडलं. हा प्रयोग सुरू असताना पोलीस समोरच उभे होते. जणू ते चोरांच्या टेकनिकचा अभ्यास करतायेत असं वाटतंय. https://x.com/DigAdvice/status/1753783663949688962?s=20

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles