हिडीओ अवघ्या काही सेकंदाचा असला तरी त्यातून जन्मभराची शिकवण मिळते. बाईक चालवताना काय करावं आणि काय करू नये, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडी. एक महिला डोक्यावर हेल्मेट वगैरे घालून, बाईकवर बसली होती, तर तिचा पती तिला बाईक चालवण्याच्या सूचना देतानाच तिचा व्हिडीओही शूट करत होता. पतीच्या सांगण्यानुसार, बाईकवर बसलेली त्याची पत्नी गिअर टाकते आणि बाईक हळूहळू पुढे जाते. नीट बाईक चालवल्यामुळे पती तिचे कौतुकही करते. मात्र समोरून एक बाईक येताचान दिसताच, तो पत्नीला ब्रेक मारण्यास सांगतो. तसेच थांबण्यासागी सांगतो. मात्र पत्नीने त्याच्या सूचनेकडे काही लक्ष दिल नाही, ना ती बाईक थांबवली. ती तशीच पुढे जात राहिली. अखेर तो दुसरा बाईकस्वार त्या महिलेच्या जवळ पोहोचला आणि जोरदार ठोकर बसून त्या दोघांचा भीषण अपघात झाल्याचे, या व्हिडीओच्या शेवटच्या फ्रेममध्ये दिसले.
Video नवरा म्हणाला ब्रेक लाव…तिने केलं दुर्लक्ष…पुढे झालं भयानक…
- Advertisement -