स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ वापरून तुम्ही झटपट दही लावू शकता. दही लावण्यासाठी विरजण लावण्याऐवजी तुम्ही मिरचीचा वापर करू शकता. स्वयंपाक घरात मिरचीही असतेच त्यामुळे ऐनवेळीही तुम्ही दही लावू शकता. मिरची वापरून दही कसे लावावे ही ट्रिक सांगणार व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, sagarskitchenofficial या अकांउटवर हा व्हिडीओ शेअर आहे.
सर्वप्रथम दूध गरम करून व्यवस्थित थंड करा. दूध व्यवस्थित थंड झाले आहे ना तपासून घ्या.दुधावर आलेली साय काढू नका तशीच राहू द्या.
त्यानंतर एका भाड्यात थंड दूध घ्या. नंतर स्वच्छ धूवून घेतलेली मिरचे देठ काढा. मिरचीचे देठ आणि मिरजी दोन्ही दुधात टाका. गरमीमध्ये ते तुम्ही कुठेही ठेवू शकता पण थंडीमध्ये कापडात गुंडाळून कोपऱ्यात ठेवा. झाकण लावून १०-१२ तास तसेच राहू द्या मग छान घट्ट दही लागेल.