सोशल मीडियावर सध्या लग्न-समारंभात मोजक्या प्रमाणात जेवण कसे करावे याची एक भन्नाट ट्रिक व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवरील @bhawnapreet_kaur_sahni नावाच्या अकाउंटवरून लग्न-समारंभांमध्ये प्रमाणात कसे जेवावे हे दाखविणारा एक व्हिडीओ शेअर झाला आहे. त्यामध्ये नेमके काय केले गेलेय ते पाहू.
व्हिडीओमधील स्त्रीने आपल्या जेवणाच्या ताटात भात घेतलेला आहे; मात्र त्याला ‘अधिक’ चिन्हासारखा आकार दिला आहे. आता त्या अधिक चिन्हाने ताटामध्ये तयार झालेल्या चार रिकाम्या भागात, बुफेमध्ये लावलेल्या विविध भाज्या ती महिला पानात वाढून घेते. असे केल्याने तुम्हाला सर्व पदार्थांची चव चाखताही येऊ शकते, तसेच सर्व गोष्टी प्रमाणात घेण्यासही मदत झालेली या व्हिडीओमधून दिसून येते.