Wednesday, April 30, 2025

उकडलेला बटाटा सोलताना हात पोळतात? १ सोपी ट्रिक…Video

नाश्त्याचे पदार्थ करण्यासाठी, भाजीमध्ये भर घालण्यासाठी, पराठे, पावभाजी, कटलेट अशा सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला उकडलेले बटाटे लागतात. हे बटाटे आपण कुकरमध्ये उकडायला लावतो खरे पण ते बाहेर काढल्यानंतर इतके गरम असतात की त्याची सालं काढताना हात पोळतात. असे हाताला चटके बसू नयेत यासाठी एक छोटीशी ट्रिक वापरली तर आपण बटाट्याची सालं झटपट काढू शकतो. या ट्रिकमुळे बटाटा अगदी सहज स्मॅश होऊ शकतो. उकडलेले बटाटे एका ताटलीत काढून सुरीने आधी अर्धे चिरुन घ्यायचे. सुरीने सालं काढतानाही बटाटा हातात धरावा लागत असल्याने चटके बसण्याची शक्यता असते.

२. त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आणि हा अर्धा केलेला बटाटा झाऱ्यामध्ये ठेवायचा. हा झाऱ्या पुऱ्या तळतो त्या मोठ्या तारेचा असेल तर जास्त चांगले. वाटीने हा बटाटा सालावरुन दाबायचा.

३. यामुळे बटाटा झाऱ्याच्या खाली जाईल आणि साल वरच्या बाजूला राहील ते काढून बाजूला फेकून द्यायचे.

४. यामध्ये बटाट्याचा हाताला स्पर्श होत नसल्याने तो गरम लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

५. ताटलीमध्ये स्मॅश केलेला बटाटा पडल्याने हाताने किंवा आणखी कशाने तो स्मॅश करण्याचीही चिंता राहत नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles