Friday, December 1, 2023

Video:सीताफळातील बिया काढण्याची झंजट मिटली….पाहा सोपी ट्रिक

सध्या सीताफळाचा हंगाम सुरू आहे. सीताफळ हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर फळ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना सीताफळ खायला आवडते. सीताफळात बिया भरपूर असतात त्यामुळे अनेक लोकांना सीताफळ खायला अवघड जाते, सीताफळाच्या बिया काढून सुद्धा सीताफळ नीट खाता येत नाही. अशावेळी सीताफळाच्या बिया कश्या काढाव्यात, असा प्रश्न पडतो पण सीताफळाच्या बिया काढणारी एक अनोखी पद्धत सध्या चांगली चर्चेत आली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सीताफळाच्या बिया सोप्या पद्धतीने कश्या काढाव्यात, हे सांगितले आहे .

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक सीताफळ दाखवले आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चमच्याने सीताफळातील बिया काढताना दिसत आहे. त्यानंतर या बिया चॉपरमध्ये टाकतात. चॉपरचा वापर करुन तुम्ही सीताफळाच्या बिया सोप्या पद्धतीने वेगळ्या काढू शकतात ज्यामुळे तुम्हाला बियांशिवाय सीताफळाचा मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो. हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: