आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. अशा वातावरणात जेव्हा सकाळी घाई- गडबडीत जेव्हा आपण खोबरेल तेलाची बाटली हातात घेतो आणि त्यातलं तेल गोठल्यामुळे अजिबात बाहेर येत नाही, तेव्हा फार चिडचिड होते .कितीही थंडी पडली तरी खोबरेल तेल गोठू नये, यासाठी नेमका काय उपाय करावा याची माहिती indiakatadkaa या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. सगळ्यात आधी तर गोठलेलं खोबरेल तेल एका भांड्यात काढा आणि ते गॅसवर थोडं तापवून पातळ करून घ्या.पातळ झालेल्या खोबरेल तेलामध्ये आमला म्हणजेच आवळ्याचं तेल १ टेबलस्पून एवढ्या प्रमाणात टाका. आवळ्याचं तेल नसेल तर अलमंड ऑईल टाकलं तरी चालेल. हे तेल टाकल्यानंतर सगळं तेल एकदा व्यवस्थित हलवून घ्या. असं केल्याने आवळा तेलात किंवा बदाम तेलामध्ये न गोठण्याचे जे गुणधर्म असतात, ते खोबरेल तेलामध्ये जातात. आणि त्यामुळे मग थंडी पडली तरी खोबरेल तेल गोठत नाही.
- Advertisement -