Sunday, September 15, 2024

फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅगवर शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के अनुदान,अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅग

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर :- कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना विशेष कृती योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदान तत्वावर फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅगेचा पुरवठा करण्यात येणार आहे. फवारणी पंपाच्या लाभासाठी ६ ऑगस्ट व कापूस साठवणूक बॅगेकरिता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारीत पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे. यासाठी राज्यशासनाकडून एकात्मिक कापूस आणि सोयाबीन इत्तर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षासाठी राबविण्यात येत आहे. २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालु खरीप हंगाम मध्ये १०० टक्के बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅग पुरविण्यात येणार आहे.

या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलवर वरील बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतक-यांना कापूस साठवणूक बॅग करीता अर्ज करता येतील. तसेच कृषी यांत्रिकिकरण या टाईल्स अंतर्गत शेतक-यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप करिता अर्ज करता येतील. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन ही श्री.बोराळे यांनी केले आहे.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles