आमिर खानची लेक आयरा खान नुकतेच नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली. मुंबईत ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर १० जानेवारीला उदयपूरमध्ये आयरा-नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यानंतर १३ जानेवारीला आयरा-नुपूरच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी देण्यात आली. या पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेतेमंडळी पाहायला मिळाले. या सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण यामधील एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
बॉलिवूड व राजकीय नेतेमंडळीच्या मांदियाळीत मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या रिसेप्शन पार्टीला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या स्टायलिश लुकने चाहत्यांच लक्ष वेधलं. त्यांनी पिवळ्या रंगाचा सुंदरचा ड्रेस परिधान केला होता. ड्रेसला साजेसा मेकअप त्यांनी केला होता. यावेळी अमृता यांनी पापराझींना फोटो काढण्यासाठी पोझही दिल्या.
Video:आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीत मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीसांची हजेरी, लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष
- Advertisement -