सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एका व्यक्तीची पत्नी नाराज होऊन तिच्या माहेरी गेल्याने आपल्या पत्नीला परत बोलवण्यासाठी पती थेट ट्रान्सफॉर्मरवर चढला आहे.सोशल मीडियावर आजपर्यंत अनेक जोडप्यांच्या भांडणाचे तर कधी हाणामारीचे गंमतीशीर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या एका कडेला आपल्याला भला मोठा ट्रांसफ़ॉर्मर दिसून येत आहे. या ट्रांसफ़ॉर्मरवर असंख्य अशा विद्युत वायरी आहेत त्यातच तो पठ्या आपल्याला ट्रान्सफॉर्मरवर उभा दिसत आहे. त्याला जमिनीवर उतरवण्यासाठी दोन व्यक्ती ट्रान्सफॉर्मरवर चढलेले दिसत आहेत तसेच घटनास्थळी पोलीस आणि परिसरातील काही लोक तिथे आलेले दिसत आहेत. त्याला ट्रान्सफॉर्मरवर असलेले व्यक्ती खाली उतरवण्यासाठी समजावून सांगत आहेत तरी तो काही ऐकताना दिसत नाही.
पत्नी मायके चली गई तो नाराज़ पति ट्रांसफ़ॉर्मर पर चढ़ गया. इसके बाद ज़िद पर अड़ गया कि मेरी बीवी को बुलाओ. मामला झांसी का है. pic.twitter.com/JOhQdfGiTe
— Priya singh (@priyarajputlive) February 22, 2024