Creta ह्युंदाई क्रेटा नव्या जमान्यातील नवे फिचर्स आणि नवा लूक घेऊन आली आहे. ह्युंदाईने क्रेटाचे फेसलिफ्ट लाँच केले आहे. एका आवाजावर ही नवी क्रेटा चालू, बंद करता येणार आहे.भारतीयांची आवड लक्षात ठेवून क्रेटाचा बाहेरील लुक बदलण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने 10.25-इंच कनेक्टेड स्क्रीन, डॅश आणइ एसी व्हेंटमध्ये बदल केले आहेत. 1.5 लीटर कप्पा टर्बो जीडीआई पेट्रोल, 1.5 लीटर एमपीआई पेट्रोल आणि 1.5 लीटर यू2 सीआरडीआय डीझेल इंजिन देण्यात आले आहे. CRETA 6-स्पीड मॅन्युअल, IVT (इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन), 7-स्पीड DCT (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह चार ट्रान्समिशन पर्यायांसह ऑफर केले आहे.ह्युंदाईच्या ताफ्यातही आता एक फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगवाली कार आहे. यामुळे ह्युंदाईने क्रेटाच्या सेफ्टी फिचर्सवरही जोरदार काम केले आहे.
लेव्हल-2 ADAS सूटमध्ये 19 सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान केली जात आहेत, ज्यात 360-डिग्री कॅमेरे, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम, फ्रंट कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग, क्रूझ कंट्रोल, मागील क्रॉस-ट्राफिक टाळणे यासारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. Alexa turn on my car, Alexa start my car असे इंग्रजी किंवा हिंदीत बोलून तुम्ही तुमची कार स्टार्ट करू शकता. यासाठी इंटरनेट देखील लागणार नाहीय.