नगरमधील इलाक्षी ह्युंदाई मध्ये नवीन न्यू एक्स्टेरचे थाटात अनावरण
नगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रँड दरम्यान विक्री पश्चात सेवा सर्व्हेमध्ये उच्च ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणार्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई येथे नवीन न्यू एक्स्टेरचे अनावरण डॉ. चेतना बहुरुपी यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक विजयकुमार गडाख, जनरल मॅनेजर राजू बेजगमवार, सेल्स मॅनेजर अजय मगर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ह्युंदाई न्यू एक्स्टेर मध्ये अत्यंत वाजवी दरात ग्राहकांना उत्कृष्ट सुविधांचा लाभ मिळणार आहे. ज्या सुविधा इतर कंपन्यांच्या वाहनांमध्ये उपलब्ध नाहीत. ह्युंदाई न्यू एक्स्टेर मध्ये 8 इंच स्क्रीन एव्हीएन, स्मार्ट फोन कनेक्टिव्हीटी (अँपल कार प्ले, अॅण्ड्रॉईड ऑटो व मीरर लिंक ), व्हाईस रेकगनिशन/अलेक्सा, मायक्रो अँटिना आणि शार्क फाइन अँटेना, रिअर एसी व्हेंट, सुपीरिअर एसी परफॉर्मन्स (135 सीसी कॉम्प्रेसर), इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर अनलॉक, रिअर पार्किंग कॅमेरा, डव्हान्स ब्लू लिंक 60+ फिचर्स, ईको कोटिंग टेक्नोलॉजी ज्याद्वारे ग्राहकास गाडीत मिळेल.
गंध विरहीत स्वच्छ व खेळती हवा, 4 सिलेंडर इंजिन पेट्रोल/1.2 इंजिन सहित, 3 वर्षे अनलिमिटेड कि.मी.ची वॉरंटी (जे अगोदर पूर्ण होईल ते लागू राहील), 3 वर्षे फ्री रोड असिस्टंट, लो कॉस्ट ऑफ मेन्टेनन्स, सहा एअर बॅग सर्व मॉडेल, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स वितरण, ड्युअल कॅमेरासह डॅशकॅम, हिल स्टार्ट सहाय्य नियंत्रण, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, वाहन स्थिरता व्यवस्थापन, स्मार्ट इलेक्ट्रॉनिक सनरूफची सुविधा उपलब्ध आहे.
सदर गाडीमध्ये 1.2 मॅन्युअल व 5 स्पीड ट्रान्समिशन सह इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. सदर गाडीमध्ये स्पर्धात्मक कंपन्यांच्या तुलनेत टाटा पंच पेक्षा जास्त सुविधा उपलब्ध आहेत. सदर गाड़ी पेट्रोल मॅन्युअल 9 व्हेरिएन्ट पेट्रोल एएमटी 6 व सीएनजी मध्ये 2 व्हेरिएन्ट मध्ये तसेच सहा आकर्षक रंगात उपलब्ध आहे. सदर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएन्ट गाडीची एक्स शोरूम किंमत 5 लाख 99 हजार 900 ते 10 लाख 990 रुपये दरम्यान राहील. नामवंत बँका व फायनान्स कंपन्यांकडून झिरो प्रोसेसिंग फी, शंभर टक्के ऑन रोड फायनान्स सुविधा उपलब्ध आहे. दररोज ग्राहकांचा बुकिंगसाठी उदंड प्रतिसाद वाढत आहे. सदर गाडी ईलाक्षी ह्युंदाई अहमदनगर येथे डेमो व टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध असून, जास्तीत जास्त ग्राहकांनी शोरूमला भेट देऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ईलाक्षी ह्युंदाईचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केले आहे.
नगरमधील इलाक्षी ह्युंदाई मध्ये नवीन न्यू एक्स्टेरचे थाटात अनावरण
- Advertisement -