आजकाल प्रत्येकाचे जीवन खूप व्यस्त झाले आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यस्त आहेत. काम आणि जवाबदारी या दोन्ही गोष्टींमुळे तणाव प्रत्येकाचा जीवनात अगदीच सामान्य झाला आहे. तसेच या सगळ्यामुळे नकळत आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आयएएस अधिकारी सुहास यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत ; ज्याच्या मदतीने आपले जीवन अधिक सोपे आणि आनंदी होऊ शकते. काय आहेत या खास टिप्स पाहू…
१. सगळ्यात पहिला त्यांनी व्हिडीओत सांगितले की, दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी एक तास तुम्हाला व्यायाम करण्याची गरज आहे.
२. दुसरं म्हणजे साकारात्म विचार. आपण प्रत्येक गोष्टींचा चांगल्या बाजूने विचार केला पाहिजे.
३. प्रत्येकाने तेल, साखरेचं सेवन थोडं कमी केलं पाहिजे.
४. मोबाईलचा वापर कमी करा आदी काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी व्हिडीओ द्वारे सांगितल्या आहेत.
चांगल्या आयुष्यासाठी 5 महत्वाच्या गोष्टी करा..IAS अधिकाऱ्याने दिल्या टिप्स…व्हिडिओ
- Advertisement -