Saturday, March 15, 2025

IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या गैरव्यवहारामुळे चर्चेत असणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणात थेट दिल्लीनं लक्ष घातल्याचं दिसून येत आहे. आधी फक्त केबिन, स्वीय सहाय्यक आणि खासगी ऑडी कारवरचा अंबर दिवा इथपर्यंतच मर्यादित असणारा पूजा खेडकर यांचा गैरव्यवहार आता थेट आयएएसमध्ये निवड होण्यासाठी चुकीची कागदपत्र देण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणात थेट पंतप्रधान कार्यालयानं लक्ष घातलं आहे. त्याशिवाय, सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी अर्थात LBSNAA ने देखील पूजा खेडकर यांच्यासंदर्भातला अहवाल महाराष्ट्र सरकारकडे मागितला आहे.

पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. मात्र, आता फक्त बदलीवर भागणार नसून त्यांच्या नोकरीवरच गदा येण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकर यांच्यसंदर्भात समोर आलेल्या गोष्टी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचं गैरवर्तन या पार्श्वभूमीवर त्यांची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं असून बुधवारी थेट पंतप्रधान कार्यालयानं पूजा खेडकर यांच्यासंदर्भातला अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यावर दिल्लीतूनही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles