आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिममध्ये बदली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तिच्याविरुद्ध प्रशासनाकडे अनेक तक्रारीही आल्या होत्या. यानंतर महाराष्ट्र सरकारचे सहाय्यक सचिव एस एम महाडिक यांनी याबद्दल परिपत्रक काढले आहे. पूजा खेडेकर या नियुक्ती आणि प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतरच्या संशयास्पद घटना यामुळे चर्चेत आहेत. पूजा खेडकर या IAS कशा झाल्या यावरुन वाद आहेत. परीक्षार्थी असताना ऑडी गाडीतून येणं, दुसऱ्यांची केबिन बळकावणे, अधिकाऱ्यांना त्रास देणे, या गोष्टी सातत्याने होत होत्या. यामुळे मी चौकशीच्या मागे लागलो आणि त्याबद्दल तक्रार केली. जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे यांनी याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट मुख्य सचिव यांना पाठवला. त्यानंतर मग पूजा खेडकर यांची वाशीम येथे बदली झाली. पण ही बदली होऊ शकत नाही, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.
पूजा खेडकर यांच्यावर जे आरोप आहेत, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. IAS झाल्यानंतर त्यांची मेडिकल परीक्षा द्यायची होती. त्या सहा वेळेस अनुपस्थित राहिल्या. तसेच ओबीसीमधून त्यांनी IAS ची परीक्षा दिली. खरं तर त्यांच्या वडिलांचं उत्पन्न 40 कोटी रुपये आहे. पण या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत, असेही विजय कुंभार म्हणाले.
नॉनक्रिमीलेयर दाखल्यात वडिलांचं उत्पादन ग्राह्य धरले जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. तसेच त्यांनी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे स्वतः लिहून दिलेलं आहे. त्यामुळे IAS हे अत्यंत प्रतिष्ठेची सेवा आहे. त्यात अशा व्यक्ती असणं चुकीचं आहे, असेही विजय कुंभार म्हणाले. त्यामुळे सध्या पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.https://x.com/VijayKumbhar62/status/1810916286819627027