Sunday, July 14, 2024

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढल्या…थेट पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या गैरव्यवहारामुळे चर्चेत असणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणात थेट दिल्लीनं लक्ष घातल्याचं दिसून येत आहे. आधी फक्त केबिन, स्वीय सहाय्यक आणि खासगी ऑडी कारवरचा अंबर दिवा इथपर्यंतच मर्यादित असणारा पूजा खेडकर यांचा गैरव्यवहार आता थेट आयएएसमध्ये निवड होण्यासाठी चुकीची कागदपत्र देण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणात थेट पंतप्रधान कार्यालयानं लक्ष घातलं आहे. पूजा खेडकर यांनी आधी काही प्रमाणात अपंगत्वाच्या श्रेणीत अर्ज केला होता. नंतर पूर्ण अपंग श्रेणीमध्ये त्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला. निवड झाल्यानंतर मात्र यासाठीच्या वैद्यकीय चाचणीसाठी सहा वेळा बोलवूनही त्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हजर राहिल्या नाहीत. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं असून बुधवारी थेट पंतप्रधान कार्यालयानं पूजा खेडकर यांच्यासंदर्भातला अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. कोणत्याही IAS अधिकाऱ्याला निवड झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी येथे एक वर्षाचं प्रशिक्षण आणि पुढे त्यांच्याच देखरेखीखाली संबंधित अधिकाऱ्याला मिळालेल्या काडर राज्यातील ठराविक ठिकाणी एक वर्षाचं प्रत्यक्ष कामावरचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे IAS पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळातील बाबींसंदर्भात या अकादमीनंही लक्ष घातलं आहे. LBSNAA चे उपसंचालक शैलेश नवल यांनी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पूजा खेडकर यांच्यासंदर्भातला अहवाल मागितला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles