Monday, July 22, 2024

IAS पूजा खेडकरांनी वाशिममध्ये पदभार स्वीकारला, यावेळी त्या नेमकं प्रसारमाध्यमांशी काय बोलल्या?

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना सरंजामी थाटात वावरण्यामुळे चर्चेत असलेल्या पोब्रेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून पूजा खेडकर यांचे उत्पन्न, श्रीमंत थाट ते त्या सनदी अधिकारी होण्यास कशाप्रकारे पात्र नव्हत्या, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पूजा खेडकर यांना त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा आणि आरोपांबद्दल विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर यांनी म्हटले की, मला सध्या काहीही बोलण्याची परवानगी नाही. मला वाशिममध्ये रुजू होताना आनंद होतोय, इथून पुढेही मला वाशिममध्ये काम करायला आवडेल. मला सरकारने काहीही बोलण्यासाठी परवानगी दिलेली नाही. यावेळी पूजा खेडकर यांना त्यांच्या उत्पन्नावरुन, नॉन-क्रीमिलेअर सर्टिफिकेटवरुन सुरु असलेल्या वादाबाबत विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर यांनी, ‘मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, या प्रकरणात मला सरकारने काही बोलायला परवानगी दिलेली नाही. मी आज वाशिमममध्ये रुजू झाली आहे’, असे खेडकर यांनी म्हटले. यानंतर पूजा खेडकर तिथून निघून गेल्या.

एक ना अनेक कारणावरून चर्चेत असलेल्या IAS प्रोबेशनल अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्यावरून थेट वाशिम येथे बदली करण्यात आली.. 8 जुलै रोजी बदलीच्या आदेशानुसार खेडकर शासनाकडून रुजू करण्याचे आदेश काढण्यात आले होते . नऊ तारखेला त्या संदर्भात तसे पत्र वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मिळालं होतं. काल दुपारीला हे पत्र वाशिम जिल्हा अधिकारी प्राप्त झालं होते. आज पूजा खेडकर ह्या प्रोबेशनल अधिकारी म्हणून वाशिम जिल्हाअधिकारी कार्यालयात वाशिम जिल्हा अधिकारी बूवनेश्वरी एस यांची त्यांनी भेट घेऊन आज अधिकृतपणे त्यांनी आपला शिकाऊ उमेदवाराचा पदभार सांभाळला. आज जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांशी भेटी घेऊन उद्या पूजा खेडकर सार्वजनिक बांधकाम विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून चार्ज स्वीकारणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles