Sunday, July 13, 2025

IAS पूजा खेडकर दिव्यांग दिसत नाही… कारवाईसाठी आ. बच्चू कडू आक्रमक…

IAS पूजा खेडकरसह (Bacchu Kadu) जबाबदार अधिकाऱ्यांची 15 दिवसांत चौकशी करुन कारवाई करा, अन्यथा मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (IAS Pooja Khedkar) यांनी दिला. कडू यांनी या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना लेखी पत्र देऊन मागणी केलीयं. दरम्यान, राज्यात IAS पूजा खेडकर प्रकरण चांगलच चर्चेत आलंय. खेडकर यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

बच्चू कडू निवेदनात म्हटले, IAS पूजा खेडकर यांनी आपण दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं आहे. प्रत्यक्षदर्शी पूजा खेडकर 40 टक्के दिव्यांग असल्याचं दिसून येत नाही. त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राची सखोल चौकशी करण्यात यावी, यासोबतच जबाबदार अधिकाऱ्यांचीही येत्या 15 दिवसांत चौकशी व्हावी, अन्यथा मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन करणार असल्याचं कडू यांनी निवदेनात स्पष्ट केलंय.

ओबीसी प्रवर्गातून पूजा खेडकर यांची युपीएससीसाठी निवड झाली आहे. त्यासाठी त्यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रही सादर केलं आहे. मात्र, त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी निवडणूक आयोगात दिलेल्या माहितीनूसार त्यांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षाही जास्त आहे, असं असतानाही पूजा खेडकर यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळालंच कसं? हे प्रमाणपत्र त्यांना कोणी दिलं? याबाबतचीही चौकशी करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केलीयं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles