दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली. विकास आयुक्त, असंघटित कामगार या कमी महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली. अप्पर मु्ख्य सचिव नितीन गद्रे यांनी मुंढे यांना बदलीचे पत्र दिले आहे. तुकाराम मुंढे यांच्या पदाचा कारभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते च्यांच्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहे. त्यांना बदल्यांचा सुलतान म्हणतात, कारण त्यांच्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची 21 वेळा बदली झाली आहे.