लोक केवळ उन्हाळ्यात नाही तर कोणत्याही ऋतूत आवडीने आईस्क्रीम खातात. त्यामुळे बाजारातही अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सची आईस्क्रीम पाहायला मिळतात. अनेक जण स्वस्तातील पाच रुपयांचे आईस्क्रीम खाणे पसंत करतात. पण, हे पाच रुपयांना मिळणारे आईस्क्रीम कशाप्रकारे बनवले जाते हे जर तुम्ही पाहिलं ना, तर तुम्हाला पुन्हा आईस्क्रीम खाण्याची इच्छा होणार नाही. सध्या सोशल मीडियावर आईस्क्रीम बनवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ती व्यक्ती इतक्या किळसवाण्या प्रकारे हाताने सर्व आईस्क्रीमचे कप भरतेय की, हा व्हिडीओ पाहून अनेक जण संताप व्यक्त करत आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाच रुपयांना मिळणाऱ्या आईस्क्रीमच्या कपमध्ये एक व्यक्ती मेल्ट झालेली क्रीम चक्क हाताने भरतेय. विशेष म्हणजे क्रीम ठेवण्यासाठी चक्क कलरची बादली वापरण्यात आली आहे. यात ठेवलेली क्रीम ती व्यक्ती एक एक करून कपमध्ये भरतेय. धक्कादायक गोष्ट म्हणजे यावेळी त्याने ना हातात कोणते फूड सेफ्टी ग्लोज घातलेत ना काही.. अगदी वाईटप्रकारे तो आईस्क्रीम कप भरण्याचे काम करतोय, इतकेच नाही तर आजूबाजूची जागादेखील अतिशय घाणेरडी, अस्वच्छ दिसतेय. https://www.instagram.com/reel/C-FoIQbSFA4/?utm_source=ig_web_copy_link