शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्र प्रकरणाच्या कारवाईला वेग दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरल्यास भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्लान बी तयार ठेवला आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाल्यास अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
याशिवाय भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील नाव चर्चेत आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाली तरी, भाजपकडे विधानसभेत १०५ आमदार, अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजित पवार यांच्या गटाचे ४० आमदार मिळून मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमताची अडचण नाही.