श्रीरामपूरची जागा न मिळाल्यास आम्ही महायुतीचे काम करणार नाहीत – सुनिल साळवे
कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळत नाही
जामखेड – आठवले साहेबांना महायुती सरकारने मंत्रीपदाची संधी दिलेली आहे. पण कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळत नाही. यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. आमची ताकद मोठी आहे आम्ही ज्यांच्या बरोबर असतोत तोच पक्ष सत्तेवर येतो. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव आहे ही जगा आरपीआय आठवले गटाला जर मिळाली नाही तर महायुतीने आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा आरपीआय चे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या
६७ वा वर्धापनदिन सोहळा निमित्त जामखेड जिल्हा अहमदनगर येथे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
यावेळी सुनिल साळवे प्रभारी जिल्हाध्यक्ष, विजय वाकचौरे, सतिश मगर, बाळासाहेब शिंदे, अविनाश भोसले, विवेक भिंगारदिवे, विशाल घोडके, पप्पू घोडके, सतिश साळवे, गौरव मगर, भौलुमे, खंडू मोरे, महादेव महारनवर, आतीश शेख यांच्या सह मोठ्या संख्येने आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा येथे पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी सर्व नेते प्रयत्नशील आहेत. यासाठी राजाभाऊ सरोदे, श्रीकांत भालेराव, सीमाताई आठवले, पप्पू कागदे, अशोक गायकवाड यांच्या सह अनेक नेते प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमासाठी उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभेचे 38 मतदारसंघ राखीव आहेत. यापैकी आम्हाला 20-22 जागा मिळाव्यात
नगर जिल्ह्यात आमची ताकद मोठी आहे
श्रीरामपूर ची जागा आम्हाला मिळाली अशी मागणी आम्ही करणार आहोत जर आम्हाला जागा मिळाली नाही तर आम्हाला महायुतीने गृहीत धरू नये.
महायुतीत सहभागी होताना दहा टक्के वाटा हा दिलेला शब्द दिला होता पण सत्ताधारी आता तो शब्द पाळत नाहीत. यामुळे कार्यकर्ते आक्रमक आहेत. आम्ही आमच्या भावना आमचे नेते आठवले साहेबांना कळवल्या आहेत.
युसुफ शेख अहमदनगर यांनी आज जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या उपस्थितीत आरपीआयमध्ये प्रवेश केला.