Monday, April 28, 2025

अहमदनगर ब्रेकिंग: ग्रामस्थांनी जाळले अवैध दारुचे दुकान….व्हिडिओ

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे सोमवारी सकाळी गावातील शेकडो ग्रामस्थांनी गावातील बेलपिंपळगाव फाट्यावरील अवैधरित्या दारू विक्रीच्या विरोधात आक्रमक होत दुकान जाळून टाकले,

गेल्या वर्षापासून गावातील अवैध दारू धंदे बंद करण्यात यावे यासाठी ग्रामस्थ आक्रमक असून मंगळवारी त्याचा उद्रेक बघायला मिळाला. सकाळी गावातील काही तरुणांनी व ग्रामस्थ यांनी हे दुकान जाळून टाकले,

गावात अनेक तरुण दारूच्या व्यसनाने ग्रासले असून याच कारणाने गावात वाद होत आहेत. येत्या दोन दिवसात जर पोलीस प्रशासनाने तातडीने यावर कारवाई केली नाही तर गावातील सर्व लहान मुलं, मुली, महिला यांना सोबत घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी सांगितले.

ग्रामस्थांनी कायदा हातात घेत गावातील अवैध दुकानं पेटवून दिले जर पोलीस प्रशासनान सहकार्य केलं नाहीतर यापुढे कठोर निर्णय घेतला जाईल असे ग्रामस्थ यांनी सांगितले.

सदर घटनेची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने गावातील चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नजर ठेवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून परत गावात कोणी असे अवैध धंदे सुरुवात केले तर अगोदर ग्रामस्थ चोप देणार मग पुढील कारवाई केली जाईल. ग्रामपंचायत जागेवर जर कोणी असे अवैध धंदे करत असताना सापडला तर त्या जागेचा करार रद्द करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला.

गेल्या अनेक महिन्यापासून बेलपिंपळगाव ग्रामपंचायत गावातील अवैध धंदे बंद करावे यासाठी पोलीस स्टेशनला सांगत आहे. तरी देखील काही दखल घेतली जात नाही. आज मात्र ग्रामस्थांनी आक्रमक होऊन दुकान जाळले. या पुढे जर कोणी सापडला तर त्याचे घर देखील जाळण्यात मागे पुढे पाहणार नाही.

– कृष्णा शिंदे, सरपंच, बेलपिंपळगाव

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles