Monday, June 17, 2024

नगर तालुक्यात इमामपूर घाटात अपघातात दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

नगर तालुक्यातील इमामपूर येथे झालेल्या अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा येथील 42 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, भेंडा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी संभाजी भिमराज मिसाळ हे सोमवार दि.20 मे रोजी पत्नी मनीषा संभाजी मिसाळ (वय 42 वर्षे) हिला घेऊन नगर येथे दवाखान्यात गेले होते.

दवाखान्यातील काम आटोपून संभाजी व पत्नी मनीषा हे दुचाकीवरुन भेंडयाकडे येत असताना दुपारी 4 वाजेच्या सुमारास अ.नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर गावाच्या कमानीजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धड़क दिल्याने झालेल्या अपघातात मनीषा ही रस्त्यावर पडून डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला. पती संभाजीने तीला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

तेथे शवविच्छेदन होऊन रात्री उशीरा भेंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. मनीषा यांच्या मागे सासू-सासरे, पती, मुलगा, मुलगी, दिर, जाऊ, पुतणे असा परिवार आहे. ज्येष्ठ नागरिक भिमराज मिसाळ यांच्या त्या सुन, संभाजी मिसाळ यांच्या पत्नी तर शिवाजी मिसाळ व त्रिंबक मिसाळ यांच्या त्या भावजय होत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles