राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे राज्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी पावसाची तूट असल्याचं चित्र आहे. पेरण्यांना ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे तर कुठे दुबार पेरण्या होत आहेत. त्यामुळे हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे शेतकरी काहीसा सुखावणार आहे.
संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा.
विदर्भात पुढील पाच दिवसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात देखील पुढील दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा.
17 जुलैपासून पुन्हा तळ कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
सोबतच उत्तर महाराष्ट्रात आज विजांसह पावसाचा अंदाज आहे.
पावसाचा जोर वाढणार, राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा
- Advertisement -