अंगणवाडी कर्मचार्यांच्या मोर्चाने जि.प.दणाणले
अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्या तात्काळ सोडवाव्यात-भाऊसाहेब वाकचौरे
नगर – गेल्या 4 डिसेंबरपासून सर्व अंगणवाडी कर्मचारी हे संपावर गेलेले असून, मुंबई मोर्चानंतर आजतागायत त्यांच्या विविध मागण्या मंजूर न झाल्यामुळे आणि काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी कर्मचार्यांना सेवेतून कमी करण्याचाही निर्णय घेतला, या विरोधात आयटक संलग्न महाराष्ट्र साईश्रद्धधा अंगणवाडी महिला संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी राज्य अध्यक्ष कॉ.दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्षा सौ.सुमन सप्रे, जिल्हा सचिव सौ.स्मिता औटी, बन्सी सातपुते, सुधीर टोकेकर, मा.रा.वाकचौरे, नयना चाबुकस्वार, अनिता पालवे, आशा बुधवंत, अलका रासकर, अनिता वाकचौरे, मिना दरेकर, सविता ढवळे, रजीश खरात, शिला देशमुख, शिंगा दिदि, वर्षा चिंधे, संगिता डोंगरे आदिं उपस्थित होते.
याप्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन, त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करुन त्यांना न्याय द्यावा, असे आवाहन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचार्यांना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युएटी लागू करावी. दरमहा पेन्शन लागू करावी. मोबाईल न देता ऑनलाईन कामासाठी मोबाईल देण्यात यावा. पोषण आहाराचा सध्याचा दर परवडत नसल्याने तो वाढवून देण्यात यावा. तसेच स्थानिक पातळीवर मागील दोन वर्षांपासून इंधन बिले थकीत असून, ती त्वरित देण्यात यावेत. बिले मिळत नाही तोपर्यंत आहार शिजवण्याची सक्ती करु नये. थकीत मोबाईल रिचार्ज, प्रवास भत्ता त्वरित द्यावा. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा लाभ संबंधितांना देण्यात यावा. तसेन जनश्री विमा योजना लाभ त्वरित द्यावा. अंगणवाडी केंद्राची वेळ परिपत्रकानुसार निश्चित करावी. तसेच दर तीन महिन्यांनी स्थानिक मागण्याबाबत सभा आयोजित करण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सौ.सुमन सप्रे, सौ.स्मिता औटी आदिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी जिल्हा परिषदेत जमले होते. घोषणांनी जि.प.परिसर दणाणून गेला होता