Tuesday, February 11, 2025

नगर शहरातील अनधिकृत मजार,थडक्याचे अतिक्रमण तातडीने काढा : आमदार संग्राम जगताप

शहरातील बालिका आश्रम रोडवरील अनधिकृत मजार,थडक्याचे अतिक्रमण तातडीने काढा : आमदार संग्राम जगताप

मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे मागणी

अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवर असणारे थडग्याचे अतिक्रमण काढावे या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू बांधवांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत मागणी केली यावेळी आयुक्त यांनी पंधरा दिवसाची मुदत मागत लेखी आश्वासन आमदार संग्राम जगताप यांना दिले. यावेळी सागर बेग, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, भीमराव आव्हाड, राहुल सांगळे, बाली बांग, सचिन जगताप, मुळु गाडळकर, दिनेश जोशी, मंगेश खताळ आदीसह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
निवेदनात पुढे म्हणाले की, अहिल्यानगर शहरातील सर्वच रस्त्यांवरील असलेली व वाढत चाललेली अवैध मजार आणि थडगे त्यामुळे शहरातील अनेक अरुंद रस्त्यावर आणि त्यात जाणूनबुजून काही विशिष्ठ समाजाकडून अनाधिकृत पणे रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी हिरवी चादर टाकून थडगे, मजार निर्माण केलेले आहेत. व काही ठिकाणी तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते यावर अश्या प्रकारचे अतिक्रमणांमुळे रस्त्याने जाण्या येण्यास मोठा अडथळा निर्माण होतो. तसेच या समाजाकडून या अवैध मजार, थडग्यावर काही कार्यक्रम घेतले जातात व त्यावेळी पूर्ण रस्ते बंद केले जातात. या समाजाकडून अश्या प्रकारचे धड़गे, मजार निर्माण करून त्या जागेवर वफ्फ बोर्डाकडून या जागेवर हक्क सांगितला जातो. अश्या प्रकारे रस्त्याची व सरकारी जागेवर अतिक्रमण करून या जागा गिळंकृत करण्याचा कट यामागे आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.तरी बालिकाश्रम रोडवरील थडग्याचे अतिक्रमण काढा अशी मंगनी हिंदूबांधवांच्या वतीने मनपा आयुक्तांकडे करण्यात आले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles