शहरात हिंदु सण – उत्सवामध्ये महावितरने सुरू केलेलं भारनियम त्वरित थांबवा – कुणाल भंडारी
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे महावितरणला निवेदन
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन महिलांची छेडछाड, स्नॅचिंग, लहान मुलांचे अपहरण, चोऱ्याच्या घटनेत वाढ
अहमदनगर – सध्या शहरांमध्ये हिंदू समाजाच्या सण- उत्सवाला प्रारंभ झाला आहे. यात गणेशोत्सव, गौरी गणपती असे उत्सव सध्या सुरू आहे परंतु शहरांमध्ये ऐन उत्सवाच्या काळात महावितरणने अघोषित भारनियम सुरू केले आहे. संध्याकाळच्या वेळेस मंडळांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. गणेशभक्त आरस, गणेशोत्सव पाहण्यासाठी येत आहेत परंतु महावितरणचे भारनियम सुरू असल्याने अनेक त्रासांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहेत, शटडाऊन असल्यामुळे पथदिवे बंद ठेवले जातात याचा फायदा काही टवाळखोर घेऊन महिलांची छेडछाड, दंगल, चेन स्नॅचिंग, लहान मुलांचे अपहरण, चोऱ्या असे विविध प्रकार घडत आहेत तरी अहमदनगर महावितरण कार्यालयाने सदर प्रश्नला गांभीर्याने घेऊन सायंकाळी व रात्री सुरू असलेले अघोषित भारनियम त्वरित थांबवावे अन्यथा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने त्रिव्रस्वरूपाच्या आंदोलन छेडू असा इशारा आज गुरुवारी निवेदनाद्वारे कुणाल भंडारी यांनी महावितरण कार्यालयाला दिला आहे.