Saturday, December 9, 2023

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय, दिवाळीआधी सर्वसामान्यांना शिंदे सरकारकडून ‘गिफ्ट

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दिवाळीत सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा १०० रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. तर विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.

विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी.

इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा
मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. यामध्ये मैदा आणि पोहे हे दोन पदार्थ वाढवले आहे. अल्पसंख्याक २७ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबिनवर जो रोग आला आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d