Tuesday, February 27, 2024

शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी! जिल्हा बँकेची ‘ही’ योजना सुरु.अध्यक्ष कर्डिले यांनी केले आवाहन

अहमदनगर-जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची दि. ३०/६/२०१६ पूर्वीच्या थकबाकीदार सभासदांकरीता जिल्हा बँकेने एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२३ अंमलात आणली आहे. थकबाकीदार शेतकर्‍यांनी योजनेचा फायदा घेण्याचे अवाहन अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्हयातील विविध कार्यकारी सेवा सोसायटयांच्या सचिवांच्या आढावा बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, या योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार सभासदांनी त्यांचे अर्ज विविध कार्यकारी सोसायटीत व शाखेत सादर करावेत.

लाभ घेणार्‍या थकबाकीदार शेतकर्‍यांना जिल्हा बँक नियमित पिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे शेतकरी नियमित कर्जदार होत असल्याने कर्जदारांना तीन लाख पिक कर्जापर्यंत शुन्य टक्के व्याज दराचा फायदा होणार आहे. पिक कर्ज अथवा इतर कर्ज नियमित परतफेड न केल्यास शेतकर्‍यांना मोठा भुरदंड बसतो.

थकीत पिक कर्जाला ११ टक्केवर व्याजदर आकारणी होते. त्यामुळे कर्जदार शेतकर्‍यांनी कर्ज वेळेत भरण्याचे आवाहन माजी मंत्री कर्डीले यांनी केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी केंद्र सरकारच्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांसाठी विविध व्यवसायांकरीता राबवणार्‍या योजनांची माहिती देवून सोसायट्यांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

अहमदनगर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बँकेचे संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सीताराम पाटील गायकर, माजी आ. राहुल जगताप, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, करण ससाणे, असिस्टंट रजिस्टार देवीदास घोडेचोर, बँकेचे अधिकारी, तालुका विकास अधिकारी, जिल्हयातील सचिव उपस्थित होते. बँकेचे सरव्यवस्थापक जयंत देशमुख यांनी आभार मानले.

Related Articles

1 COMMENT

  1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती प्रक्रिया कुठपर्यंत आलंय. नवीन भरती.

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles